National Education Award announced to Teacher Hanumant Naik
महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्य कार्यक्षेत्र असलेल्या दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनचा
राष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक हनुमंत लक्ष्मण नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी २५ सप्टेंबर रोजी पणजी पाटो अवाके इव्हेंट्स कॉन्फरन्स सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय फिनिक्स अवार्ड – 2022 या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
मुळचे देवसू येथील हनुमंत नाईक एम.ए. बी .एड पदवी धारक असुन गेली 22 वर्ष सुरुवातीपासून ते आतापर्यंत सांगेली येथे एकाच शाळेत कार्यरत आहेत. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी मुलांना ते मार्गदर्शन करतात. त्यांनी हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबवून शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी तसेच खेळांमध्येही मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांनी पर्यावरण विषयाचे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असुन शालेय वसतिगृहामध्ये रेक्टरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतात. दरवर्षी गरीब व होतकरू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणासह दहावी- बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देतात. तसेच शुद्ध पाण्यासाठी शाळांना RO वॉटर प्युरिफायर भेट, आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप आणि आर्थिक सहाय्य तसेच प्राथमिक शाळांना डिजिटल साहित्य वितरण करतात. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ओटवणे /प्रतिनिधी-