Tarun Bharat

इंदोरच्या प्रोस्टिज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे राष्ट्रीय फेस्ट मंथन 2022

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

इंदोरच्या प्रोस्टिज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे राष्ट्रीय फेस्ट ‘मंथन 2022’ चे आयोजन केले होते. केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून 35 संघ या फेस्टसाठी आले होते.

अभिषेक सलगर यांनी छायाचित्र स्पर्धेत प्रथम, आदर्श पाटील आणि स्मिता लिंबीकाई यांना दलाल स्ट्रीट स्पर्धेत प्रथम, विशाल मायलक्केना रील मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले. फॅशन शो स्पर्धेत श्रीनिधी हुक्केरी यांनी बेस्ट स्माईलचे आणि श्रेयस सावंत यांनी बेस्ट वॉकचे बक्षीस मिळविले.

प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी विजेत्यांचे अभिनंदन आणि शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक केले. कॉलेजकडून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे प्रोत्साहन देण्यात येते. एमबीए विभागाचे डीन डॉ. केएसएल दास यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संघ, वेळ, संसाधनांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य वाढते. प्रमोद कठवी, गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक, केएलएस व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

इशारा देऊनही रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni

आंतरजिल्हा प्रवासातूनही युवकाला कोरोना

Rohan_P

आयुक्त रजेवर पगार नाही खात्यावर

Amit Kulkarni

मिनी ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये डायनॅमिक क्लबच्या खेळाडूंचे यश

Amit Kulkarni

महिला आघाडीने घेतल्या महिला मंडळांच्या गाठीभेटी

Amit Kulkarni

मराठी शाळांवर कन्नड सीआरपी थोपण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!