विशेष खेळाडू होणार स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये सहभागी
प्रतिनिधी /पणजी
वैविध्यतेचा सोहळा म्हणून लोकप्रिय असलेला पर्पल फेस्ट 2023 हा महोत्सव गोव्यामध्ये 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. विकलांग व्यक्तींसाठीचे राज्य आयुक्त-गोवा, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने या सोहळय़ाचे आयोजन केले जात आहे. पर्पल फेस्ट 2023 निमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे राष्ट्रीय उपक्रम गोव्यामध्ये होणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या महोत्सवामध्ये पणजीमध्ये स्पेशल ऑलिम्पक्सि होणार आहे. यामध्ये अखल भारतीय ओपन पॅरा टेबल टेनिस स्पर्धा, युनफाइड बीच क्रिकेट, अंधांसाठीची क्रिकेट स्पर्धा तसेच पर्पल-रन गोवा मॅराथॉन यांचा समावेश आहे.
“आपल्या देशात क्रीडा उपक्रमांना मोठी लोकप्रियता आहे. देशातील 2.5 ते 5 टक्के लोकसंख्या ही विकलांग असल्याने या घटकांसाठीही खेळांचा प्रसार करणे आवश्यक आहे. या तीन दिवसीय क्रीडा उपक्रमामध्ये ऑल इंडिया ओपन पॅरा टेबल टेनिस चॅम्पयिनशिप, युनिफाइड बीच क्रिकेट, अंधांसाठीची क्रकेट स्पर्धा आणि पर्पल-रन गोवा मॅराथॉन हे क्रीडा उपक्रम या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय स्तरावरील विकलांगांसाठीचा क्रीडा उपक्रम ठरणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद गोवा राज्य करणार आहे, अशी माहिती गोवा राज्य विकलांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.
पॅरा-टेबल टेनिस हा पॅरा स्पोर्ट्स कार्यक्रमातील सर्वात अद्वितीय खेळांपैकी एक आहे. यामध्ये शारिरीक विकलांगतेनुसार 10 श्रेणींमध्ये विभागणी केली जाते ः श्रेणी 1 ते 5 मधील पॅरा-टेबल टेनिस खेळाडू व्हीलचेअरवरून तर श्रेणी 6 ते 10मधील खेळाडू स्वतःच्या पायावर उभे राहून खेळू शकतात.
युनिफाइड बीच क्रिकेट भारतात प्रथमच दाखल होत आहे. बीच क्रिकेट हा क्रिकेट खेळाचा आरामशीर प्रकार आहे जो कोणीही खेळू शकतो. या खेळामध्ये सहभागी खेळाडू त्यांचे स्वतचे नियम तयार करू शकत असल्याने संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी एक मनोरंजक खेळ ठरत आहे.
विशेष खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा ही अंध किंवा अंशतः अंध खेळाडूंसाठीची क्रिकेटची आवृत्ती आहे. अंधांसाठीच्या क्रिकेटमध्ये खेळाडू ’स्वीप शॉट’वर अवलंबून असता कारण या फटकामध्ये बॅटने चेंडू फटकावण्याची शक्मयता अधिक राहते.
पर्पल आय-रन गोवा मॅरेथॉन ही 21 विकलांग प्रकारांसाठी गोव्याची पहिली राष्ट्रीय मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनचा उद्देश समाजातील विकलांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशकता आणि स्वीकार्यतेला चालना देण्याचा आहे. सर्व वयोगट श्रेणींमध्ये सामान्य धावपटूंसमवेत विकलांग स्पर्धकही धावणार आहेत.
“पर्पल फेस्टमध्ये मिरामार बीचवर 3 जानेवारी रोजी युनिफाइड बीच क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. तर 6 जानेवारी रोजी आयनॉक्स परिसरात खेळांचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे. पर्पल फेस्टच्या निमित्ताने भारतात प्रथमच युनिफाइड बीच क्रिकेट हा क्रीडाप्रकार सादर होत असल्याचा आनंद आहे,’’ अशी माहिती भारत विशेष ऑलिम्पक्सिचे राष्ट्रीय क्रीडा संचालक आणि युनिफाइड बीच क्रिकेटचे समन्वयक व्हिक्टर आर. वाझ यांनी दिली.
“पॅरा टेबल टेनिस या खेळामुळे विकलांग खेळाडूंनाही प्रकाशझोतात आणण्याची किमया साधली आहे. पॅरा टेबल टेनिसचा खेळ मानसिक तसेच शारिरीक क्षमतांचा विकास करणे, शारिरीक सुसूत्रता वाढवणे यासाठी उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव आहे. मनाची सजगता, एकाग्रता व प्रसन्नता राहते, या खेळामुळे मनाची अचूकता वाढते तसेच मेंदूही तल्लख होण्यास चालना मळते. पर्पल फेस्टमध्ये योगदान देण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन विकलांग खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे,’’ असे आवाहन बांबोळीगोवा येथील मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संशोधन संस्थेचे सायकियाट्रिस्ट सोशल वर्कचे सहाय्यक प्राध्यापक तसेच पर्पल फेस्टमधील अखिल भारतीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धा गोवाचे मॉडरेटर सुदेश गावडे यांनी केले.
गोव्यामध्ये एक चांगला उपक्रम होत आहे. अशा प्रोत्साहन देणाऱया उपक्रमांमधून विकलांगतेच्या समस्यांप्रती सर्वांच लक्ष वेधले जात आहे. पर्पल फेस्त उपक्रमासाठी सर्वोच्च प्राधान्य देणारे राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रयत्नांप्रती व त्यांच्या ध्यासपूर्ण कार्याची प्रशंसा करतानाच त्यांचे आभारही व्यक्त करतो, असे गोवा अंध क्रिकेट संघाचे कर्णधार यशवंत नागेशकर यांनी सांगितले.
8 रोजी मॅरेथॉन स्पर्धा
21 प्रकारच्या विकलांग प्रकारांचा समावेश असलेली पर्पल आय-रन गोवा मॅरेथॉन ही गोव्यातील पहिली राष्ट्रीय मॅरेथॉन ठरणार आहे. बांबोळीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर रविवारी 8 जानेवारी 2023 रोजी ही अर्ध-मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या मॅरेथॉनचा उद्देश समाजातील विकलांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशकता आणि स्वीकार्यतेला चालना देण्याचा आहे. सर्व वयोगट श्रेणींमध्ये सामान्य धावपटूंसमवेत विकलांग स्पर्धकही धावणार आहेत, अशी माहिती आय-हेल्प फाउंडेशनचे संचालक प्रवीण मौर्य यांनी दिली.