Tarun Bharat

गोमंत विद्या निकेतनमध्ये 12 रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन

प्रतिनिधी /मडगाव

शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी गोमंत विद्या निकेतनमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त यंदा डॉ. बिभिषण सातपुते यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले असून यंदाच्या कार्यक्रमात वर्षपद्धतीप्रमाणे संस्थेच्या वाचनालयाचे चोखंदळ बालवाचक आणि प्रौढ वाचक यांना ‘वाचक श्री’ आणि ‘वाचक भूषण’ हे पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. दर वर्षाप्रमाणे याच कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेतर्फे गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया वार्षिक शिष्यवृत्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

डॉ. बिभिषण सातपुते हे फर्मागुडी येथील गोवा इंजिनियरिंग कॉलेजचे माजी प्रमुख ग्रंथपाल असून त्यापूर्वी काही काळ वास्को येथील एम. ई. एस महाविद्यालयाचे ग्रंथपाल म्हणून सेवेत होते. गेली दहा वर्षे कार्यकारी संचालक म्हणून फोंडा येथील विद्यासागर करियर इन्स्टिटय़ूमध्ये ते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षण देत आले आहेत. ग्रंथपाल शास्त्र या विषयांत त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी संपादन केली आहे. निवृत्तीनंतर 2014 मध्ये त्यांनी ही पदवी मिळवली आहे हे विशेष. ‘मेंढवाडा’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले असून अलिकडेच ‘स्ट्रँग फाऊंडेशन-काळाची गरज’ यो त्यांच्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

शुक्रवार, दि. 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता संस्थेच्या दुसऱया मजल्यावरील फॉमेंतो एम्फीथिएटरमध्ये होणाऱया यंदाच्या ग्रंथपाल दिनाला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन गोमंत विद्या निकेतनतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

काणकोणच्या 6 पंचायतींचा कारभार नव्या सरपंचांकडे

Amit Kulkarni

गोवा फॉरवर्डतर्फे चिदंबरम यांच्या निवेदनाबाबत आश्चर्य व्यक्त

Omkar B

निम्न शिक्षक-पोलिसांत संघर्ष

Amit Kulkarni

फातोर्डातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

मांदे मतदार संघातील कोरोनाचा पहिला बळी , संजू पराष्टेकर यांच्या निधनाने पेडणे तालुक्मयात हळहळ व्यक्त

Omkar B

योग जागृतीमुळे अनेक देशांची कोरोनावर मात

Amit Kulkarni