प्रतिनिधी /बेळगाव
एमएलआयआरसीचे स्टेशन कमांडर आणि एलबीएचे चेअरमन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची स्थानिक मंडळ प्रशासनाची (एलबीए) सभा नुकतीच पार पडली. सभेला 11 सभासद उपस्थित होते.
सभेत छात्रांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा, संस्थेचे कामकाज सुरळीत चालविण्याबाबतच्या सूचना, एकसष्टी साजरी करणे, महिला छात्रांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत चर्चा झाली. लेफ्टनंट कर्नल सतवीर सिंग यांनी आभार मानले.