हिमोग्लोबिन तपासणी : बालकांचे कुपोषण कमी करण्याबाबत मार्गदर्शन : विविध स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
महिला व बालकांचे पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा होत आहे. या अंतर्गत जिल्हय़ातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे अयोजन केले जात आहे.
या अंतर्गत पोषण अभियानामध्ये पोषणयुक्त आहाराची उत्कृष्टरित्या मांडणी करण्यात येत आहे. जिल्हय़ात 5 हजार 331 अंगणवाडी केंदे आहेत. या केंद्रांमध्ये बालकांची संख्यादेखील अधिक आहे. दरम्यान बालकांमधील कुपोषिकता कमी करण्यासाठी शासनामार्फत पोषण अभियान राबविले जात आहे. या अभियांनांतर्गत अंगणवाडी केंद्रातून बालकांच्या आहाराबाबत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पोषण अभियान बालकांच्या दृष्टीकोनातून सफल होताना दिसत आहे.
तालुक्मयातही अंगणवाडी केंद्रांची संख्या अधिक आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही गावोगावी अंगणवाडी केंदे आहेत. या सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण अभियान कार्यक्रम राबविले जात आहे. या अंतर्गत गर्भवती महिला, स्तनदा माता, 0 ते 13 वर्षांखालील बालकांना पोषण आहार कसा द्यावा, शिवाय गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.
महिनाभर उपक्रम
याबरोबरच पोषण अभियान अंतर्गत सहभोजन कार्यक्रम, गर्भवती महिलांना डोहाळे पुरवा कार्यक्रम, हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, तसेच उत्तम पोषणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबरोबरच कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना, किचन गार्डन बनविण्यावर भर देण्यात येत आहे. यासह अन्य उपक्रम महिनाभर जिल्हय़ातील अंगणवाडी केंद्रातून राबविले जात आहेत.
पौष्टिकतेबाबत मार्गदर्शन
गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करून शासनामार्फत पोषण अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत विविध आहार आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गर्भवती महिला आणि बालकांना पौष्टिक आहाराबाबत माहिती दिली जात आहे.
– ए. एम. बसवराजू (सहसंचालक महिला व बालकल्याण खाते)