पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सप्टेंबर 14 रोजी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तेव्हा पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रे•ाr यांनी केले आहे.
तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. या लोक अदालतीमधून हजारो खटले निकालात काढले जातात. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचू शकतो. या न्यायालयामध्ये खटले मोफत निकालात काढले जातात. यामध्ये दिवाणी, फौजदारी, चेक बाऊन्स, नुकसानभरपाई संदर्भातील, विमा नुकसानभरपाई, कौटुंबिक न्यायालयातील खटले निकालात काढले जात आहेत. तेव्हा पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.