पत्रकार परिषदेत माहीती ; दिल्लीत दि.27 रोजी होणार वितरण
वार्ताहर/ कुडाळ
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱया, स्वच्छतेच शहर म्हणून नावलौकीक असलेल्या पाचगणी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पेंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा सर्वोच्च पर्यटन सुविधा देणार शहर म्हणून पाचगणी शहराची नियुक्ती झाली आहे. पेंद्रीय मंत्रालयाने पाचगणी शहराला नॅशनल टुरीझम अवॉर्ड करीता पाचगणी शहराची नियुक्ती झाली असल्याची माहीती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर पत्रकार परिषदेत दिली.
पाचगणी शहराला प्रशासक म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लाभलेले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची दैदिप्यमान कामगिरी म्हणून पाचगणी शहराला नॅशनल टुरीझम अवॉर्ड मिळाल्याने शहरात मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले जात आहे. जगविख्यात दोन नबंरच पठार, स्वच्छतेच शहर म्हणून नावलाकीक असलेल्या पाचगणी शहरात भारतातून येणाऱया पर्यटकांना मुलभूत सुविधा देताना उत्कृष्ट नियोजन केले जाते. पेंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून याबाबत प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती. पर्यटकांना मुलभूत सुविधा देणारा सर्व बाबीच परिपूर्ण अहवाल पाचगणी नगरपालिकेकडून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला सादर करण्यात आला होता.
यावरुन पेंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या टीमने पाचगणी शहरात येऊन सर्व्हे देखील केला. शहराला देण्यात येणारा नॅशनल टुरीझम अवॉर्ड दिल्ली येथे दि. 27 सप्टेंबरला देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी नगसेवकांचा सिंहाचा वाटा
पाचगणी शहराला मिळालेला पुरस्कारात सर्वार्थी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांचा सिहांचा वाटा आहे. हा पुरस्कार पाचगणी शहराच्या सर्वसामान्य जनतेच यश असल्याचे प्रतिक्रीया मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. पाचगणी शहराला पेंद्र शासनाचा मिळालेला नॅशनल टुरीझम अवॉर्ड मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांच नेटक व्यवस्थापन व शहरातील पर्यटकांना मुलभूत पर्यटनाच्या सुविधाचे फळ असल्याचे हे मात्र आता लपून राहीले नाही.