Tarun Bharat

‘नाटू नाटू’ची ऑस्करमध्ये एंट्री

सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी मिळाले नामांकन

@ वृत्तसंस्था / बेव्हर्ली हिल्स

95 व्या ऑस्कर अवॉर्ड्स 2023 साठीची नामांकने जाहीर झाली आहेत. एस. एस. राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने यात स्थान मिळविले आहे. सर्वोत्कृष्ट गीतासाठी हे नामांकन मिळाले आहे. एम. एम. कीरावानी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. नाटू नाटू या गीताला ऑस्करसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहे.

‘नाटू नाटू’ गाण्याने लेडी गागा आणि री-री यांच्या गाण्यांनाही मागे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा ‘नाटू नाटू’ने आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वतःच्या नावावर करावा अशी इच्छा भारतीयांकडून व्यक्त होत आहे. ऑस्कर अवॉर्ड्स 2023 नॉमिनेशन्स कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्समध्ये जाहीर करण्यात आली आहेत.

शॉनक सेन यांचा बोधपट ऑल दॅट ब्रेथेस देखील ऑस्करचे नामांकन मिळविण्यास यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक गुनीत मोगींचा द इलिफंट विस्पर्स हा लघूबोधपटाला देखील नामांकन मिळाले आहे. भारतातील एक चित्रपट आणि दोन बोधपट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचल्याने देशात आनंद व्यक्त आहे, परंतु भारताकडून अधिकृत एंट्री म्हणुन सादर ‘छेलो शो’ला कुठलेच नामांकन मिळविता आलेले नाही.

राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने अलिकडेच गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविला होता. या गाण्याने सर्वोत्कृष्ट गीताच्या शेणीचा पुरस्कार स्वतःच्या नावावर केला होता. ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याने आरआरआरची पूर्ण टीम अत्यंत आनंदी आहे.

‘अवतार ः द वे ऑफ वॉटर अँड टॉप गन’, ‘द बॅटमॅन’, ‘द एल्विस’, ‘टॉप गन मेवरिक’ या चित्रपटांनी ऑस्करच्या शर्यतीत स्वतःचे स्थान राखले आहे. हेच चित्रटपट ऑस्करच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 

‘आरआरआर’ला विदेशात मोठी लोकप्रियता

‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासह समीक्षकांनीही याचे कौतुक केले होते. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात 1200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. या चित्रपटाला विदेशातही मोठी लोकप्रियता लाभली आहे. अमेरिका आणि जपानमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Related Stories

प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू

Archana Banage

वेडिंग ड्रेस घालून 285 किमीची दौड

Patil_p

प्रत्येक घराबाहेर एक विमान

Patil_p

‘ट्रम्प हट्ट’: अमेरिकेची सुरक्षा धोक्यात

Omkar B

जगभरातील बाधितांचा आकडा 10 कोटींसमीप

datta jadhav

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखांचा टप्पा

datta jadhav