फोंडा : नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ नॅचरोपथी, आयुष मंत्रालय, इंटरनॅशनल नॅचरोपथी ऑर्गनायझेशन (सूर्या फाऊंडेशन), किलबिल किड्स नेस्ट खांडोळा व सम्राट क्लब खांडोळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच निसर्गोपचार शिबिर किलबिल किड्स नेस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेतकी-खांडोळाचे सरपंच विशांत नाईक, खास अतिथी म्हणून खांडोळा सम्राट क्लबचे अध्यक्ष शलाका लवंदे, प्रादेशिक अध्यक्ष डॉ. एल. फ्रेन्क्लीन हर्बट दास, विद्यावृद्धी संस्थेचे अध्यक्ष उदय डांगी, मुख्याध्यापिका रुक्मी डांगी आदी उपस्थित होत्या. रुक्मी डांगी यांनी निसर्गोपचार शिबिराविषयी माहिती दिली. यावेळी 13 डॉक्टरांनी एक्युप्रेशर योग थेरपी, कंश थाळी थेरपी व नाडी परीक्षाद्वारे रुग्णांवर उपचार केले. 227 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. उदय डांगी यांच्याहस्ते डॉक्टरांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका ग्रेटा वाझ यांनी केले. पल्लवी नार्वेकर यांनी आभार मानले.
Previous Articleअभंग गायन स्पर्धेत राज्ञी फळदेसाई, साईराज गावडे प्रथम
Next Article स्वतंत्र नारळ विकास मंडळासाठी कृषीमंत्री प्रयत्नशील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.