Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक कलमेश्वर मंदिरात नवचैतन्य

Advertisements

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रम

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

‘हरहर महादेव’च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुकचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरामध्ये घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त्य मध्य चौकापासून कलमेश्वर मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई केली आहे.

मंदिरामध्ये नवरात्रोत्सव काळात पंचक्रोशी व बाहेर गावातील अनेक भक्त आपले नवस फेडण्यासाठी नऊ दिवस मंदिरामध्ये वास्तव करुन राहतात. यावेळी सकाळ-संध्याकाळ केवळ फळे सेवन करतात.

मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण असते. दररोज सकाळी आरती व पूजन, रात्री श्री कलमेश्वर देवस्थानच्या पालखीची मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर गाऱहाणे घालण्यात येतात.

मंदिरामध्ये वास्तव केलेल्या भक्तांना सकाळी फराळ झाल्यानंतर दिवसभर रात्री फराळ होईपर्यंत पाणीसुध्या पिण्यास मनाई आहे. दररोज रात्री गावातील भजनी मंडळींचा भजन कार्यक्रम असतो. अष्टमी दिवशी रात्रभर देवस्थानची पालखी मंदिराबाहेर ठेऊन भजनी भारुड कार्यक्रम होतो. विजयादशमी दिवशी श्री कलमेश्वर देवस्थानची पालखी पूर्वेला असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे नेली जाते. श्री कलमेश्वर व श्री सिद्धेश्वर भाऊ असल्यामुळे प्रत्येक वर्षी विजयादशमी दिवशी दोन्ही भावांची अशाप्रकारे भेट घडवून आणली जाते, अशी अख्यायिका आहे.

रांगोळी-फुलांनी सजवितात रस्ते

विजयादशमी दिवशी श्री कलमेश्वर देवस्थानच्या पालखी गावातील विविध देवदेवतांची भेट घेत श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे आणली जाते. पालखी रस्ते भाविकांकडून फुले व रांगोळय़ांनी सजविलेले असतात. पालखी श्री सिद्धेश्वर देवस्थानजवळ आल्यानंतर प्रदक्षिणा घालून गाऱहाणे घालतात.

पालखी मिरवणूक

संध्याकाळी गावात टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते. मिरवणूक दरम्यान आरती ओवाळून श्री कलमेश्वर देवस्थानचे दर्शन घेतात. शेवटी मंदिराला प्रदक्षिणा घालून  नवरात्रोत्सवाची सांगता होते.

Related Stories

सोमवारी रुग्णसंख्येत घसरण

Patil_p

पहिल्याच दिवशी जिल्हय़ात 62 अर्ज दाखल

Patil_p

स्मार्ट रस्त्यांच्या विकासकामामुळे वाहतुकीचे तीनतेरा

Patil_p

कचरावाहू वाहनाच्या बॅटरीची चोरी झाल्याने कचरा उचल ठप्प

Amit Kulkarni

उद्यमबाग येथे चहाच्या टपरीला आग

Patil_p

कलामंदिर व्यापारी संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!