Tarun Bharat

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचा तुयेत सत्कार

मोरजी/प्रतिनिधी

नावेली मतदार संघाचे भाजप आमदार तथा तुये गावचे सुपुत्र उल्हास तुयेकर यांचा त्याच्या मूळ तुये गावी श्री भगवती देवस्थान आणि तुये ग्रामस्था तर्फे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या  हस्ते हृद्य सत्कार कारण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे,मांदे मतदार संघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळा चे अध्यक्ष जित आरोलकर ,माजी आमदार दयानन्द सोपटे,श्री भगवती देवस्थान अध्यक्ष चंद्रशेखर नाईक,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक,पदाधिकारी प्रकाश नाईक,रोहिदास नाईक,संतोष नाईक,दत्तात्रय नाईक, सत्यवान नाईक,आदी उपस्थित होते

यावेळी  आपल्या भाषणात मुख्यमंत्री डॉ सावंत यानी आमदार उल्हास तुयेकर यांचे विशेष अभिनंदन केले.ते म्हणाले तुयेचा भूमिपुत्र नावेली सारख्या अल्पख्यांक जागी आमदार म्हणून निबडून येण्याची किमया करतो   त्यामागे त्यांची जिद्द , प्रामाणिक पणा आणि संघटन कौशल्य दिसून येते.सुरवाती पासून पक्षाने टाकलेली जबाब दारी त्यांनी प्रामाणिक पणे निभावली आहे असा विश्वासू  कार्यकर्ता सापडणे दुर्मिळ आहे. आजचा हा सत्कार एका भाजप कार्यकर्त्याचा सत्कार आहे.बहुजन समाजाचा  ऐक साधा आनि सच्या कार्यकर्ता   भाजपातुनच आमदार होऊ शकतो याचे तुयेकर उदाहरणं आहे.

गोव्याच्या विकासात पेडण्याचा महत्वाचा वाटा आहे आज मोपा विमानतळ,तुये इलेट्रॉनिक सिटी आदी प्रकल्पा साठी त्याग केलेल्या इथाल्या लोकांना निश्चितच मोबदला मिळेल त्यासाठी स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर गोवा हे मोदींचे स्वप्न  साकार करण्यासाठी सहकार्य करा येणाऱया काळात पेडणे एक आदर्श तालूका करूया असे त्यांनी सांगितले.

पक्षाचे अध्यक्ष श्री तानावडे म्हणाले उल्लास तुयेकर पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे असे कार्यकत्तेच पक्षाचा अमोल ठेवा आहे त्याचा आदर्श इतररानी घ्यायला हवा असे  सांगितले.

आमदार जित आरोलकर म्हणाले,  उल्हास तुयेकर आणि आपल्या रूपाने  रूपाने तुये गावाला दोन आमदार मिळाले आहेत आम्ही एकत्रित पणे काम करताना माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या अपूर्ण राबवू मार्गी लावू त्यासाठी माजी आमदारांनी सहकार्य करावे असे सांगून श्री आरोलाकर पुढे म्हणाले, तुये पंचायत आणि पेडणे पालिकेचा अनेक वर्षांचा सीमा वादावर  मुख्य मंत्र्यानी लवकर तोडगा काढावा तसेच तुये उद्योगिक  वसाहतीतीत  रोजगार् निर्मिती  क्षम उद्योग आणा वेत अशी मागणी करून मतदार संघात विजेसाठी 100 कोटी इतका निधी मंजूर केल्याबद्दल मुख्य।  मंत्र्यांचे आभार मानले.

माजी आमदार दयानंद सोपटे यांनी  तुयेच्या सुपुत्राने नावेलीत आमदारकी चा झेंडा लावल्या बद्दल अभिनदन केले तसेच आपल्या जन्मभूमी च्या विकासात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 ज्ञानेश्वर नाईक यांनी स्वागत केले .चंद्रशेखर नाईक यांनी प्रास्ताविक केले.  सिद्धी नाईक यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ काशी रंगनाथ नाईक यांनी सौ तुयेकर यांची ओटी भरली

यावेळी मुख्यमत्रि डॉ सावंत याच्या हस्ते आमदार उल्हास तुयेकर आणि  आमदार जित आरोलकर यांचा सत्कार करण्यात आला. किशोर नाईक गांवकर यांनी सूत्रसंचालन केले  दत्तात्रय नाईक यांनी आभार मानले

Related Stories

गोवा : काँग्रेसकडून आलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट

Abhijeet Khandekar

दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणार

Patil_p

फोंडय़ातील पहिला रुग्ण आडपईत

Omkar B

फोंडा भाजपा मंडळातर्फे डॉ.प्रमोद सावंत मुख्यमंत्री निवडीबद्दल आनंदोत्सव

Amit Kulkarni

कोरोनामुळे चतुर्थीची उलाढाल झाली अल्प

Patil_p

दुःखद संकट असतानाही आरोग्यमंत्र्यांचा संधीसाधूपणा

Patil_p