Tarun Bharat

नवनीत राणा काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, पण…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काही दिवसांपूर्वी राज्यात हनुमान चालिसावरून वातावरण तापलं होतं. अशातच बुधवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad) झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddav thackery) यांनी हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्याला इशारा दिला होता. तसेच हनुमान चालीसा पठण करायची असल्यास जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन करा असे आव्हान त्यांनी राणा दाम्पत्याला दिलं होतं. यावरूनच खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याचं सांगून, मुख्यमंत्र्यांनी केलेलं आव्हान स्वीकारलं आहे.

दरम्यान काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना दिलं होतं. पण नवनीत राणा यांनीच हे आव्हान स्विकारलं असून, त्या म्हणाल्या की, काश्मीर हे भारताचं अंग आहे आणि तिथे जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणं कठीण आहे असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर मी तिथे जाऊन नक्की हनुमान चालीसा वाचन करेन असे प्रतिआव्हान त्यांनी केले आहे. तसेच त्या अगोदर तुम्ही मातोश्रीवर हनुमान चाळीस पठण करणार आहेत का? असा प्रश्न देखील राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

ज्यादिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीवरती हनुमान चालीसा पठण करतील त्याच दिवशी मी काश्मिरला जाण्याची तारीख आणि वेळ जाहीर करणार असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. मुख्यमंत्री केवळ सभेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतात. विकासावर बोलत नाही अशी टीका देखील केली राणांनी केली आहे.

दरम्यान ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. त्यासभेत मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आव्हान दिले होते. तेच आव्हान नवनीत राणांनी स्वीकारले आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री आणि राणा दाम्पत्य संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

Related Stories

तटस्थ विद्युत लोकपालसाठी वीज ग्राहक संघटनेचा आग्रह

Sumit Tambekar

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांना घरी उपचार घेता येणार नाही

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : बुधवारी 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

सांगली : जुना कराड पंढरपूर रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

Abhijeet Shinde

देशात मागील चोवीस तासात 6,566 नवे कोरोना रुग्ण, 194 जणांचा मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रात 2,515 नवे कोरोना रुग्ण, 35 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!