ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्या अटकप्रकरणी संसदेच्या विशेषाधिकार आणि अचारसंहिता समितीकडून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava), मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pande) यांना समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच १५ जून रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठाण करण्याच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक झाला होती. यानंतर आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार करत नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्यातील दोन बड्या अधिकाऱ्यांना तोंडी पुराव्यांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनोजकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे या सर्व बड्या अधिकाऱ्यांना १५ जून रोजी संसदेच्या समितीसमोर दुपारी १२.३० पर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.