ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन वातावरण तापलेलं असताना अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसेवरुन आव्हान दिलं. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान त्यांनी दिलं. यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (Navneet Rana Challenges Uddhav Thackeray To Read Hanuman Chalisa At Matoshree)
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना मातोश्रीसमोर हनुमान चाळीसा पठण करण्याचं आव्हान दिल होतं. तर नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. तर राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर येमार असल्याने सर्व शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आहेत. दरम्यान, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर यावं आणि शिवसेनेचा महाप्रसाद घेऊन जा, असा इशारा सरदेसाई (varun sardesai) यांनी दिला.
“दोन दिवसांपूर्वी देखील आव्हान दिलं होतं. तेव्हासुद्धा आम्ही म्हटलं होतं की मातोश्री हे शिवसैनिकांसाठी देऊळासमान आहे. कोणी आमच्या देऊळावर आक्रमण करणार असेल तर हा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. गनिमी कावा कशाला म्हणायचा आणि पळपुटे कावा कशाला म्हणायचा? दोन दिवसांपूर्वी आव्हान दिलं घाबरले. माध्यमांसमोर २३ एप्रिलची तारीख दिली आणि आज २२ तारीखलाच आले. परत एकदा घाबरले. म्हणून आम्ही इथे आलो आहोत. वारंवार तारखा देण्यापेक्षा एकदाचे तुम्ही या, शिवसैनिक इथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही म्हणालात मातोश्रीसमोर येणार, आम्ही मातोश्रीसमोर आलेलो आहोत, आमचा प्रसाद घेऊन जा,” असं वरुण सरदेसाई म्हणाले.