ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालणं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भोवलं आहे. राणा यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लव्ह जिहाद प्रकरणातून अमरावतीमधील 19 वर्षीय युवतीचे अपहरण करण्यात आलं असून, तिचं धर्मांतर केलं जात आहे, असा आरोप करत राणा यांनी राजापूर पोलीस ठाण्यात अर्धा तास गोंधळ घातला होता. त्या मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, अशी मागणी त्या करत होत्या. दरम्यान, या प्रकरणातील बेपत्ता युवती साताऱ्यात सापडली. त्या तरुणीने मला कोणीही पळवून नेलं नाही, मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणांचा आरोप खोटा आहे, असा जबाब अमरावती पोलिसांना दिला.
अधिक वाचा : 5 ते 18 वयोगटासाठी लवकरच नाकावाटे कोरोना लस
त्यानंतर कथित लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाच्या वडिलांनी धमकावणे आणि कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी राणा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.