मानेचा त्रास होऊ लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल
ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार नवनीत राणा १२ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आल्या आहेत. नवनीत राणा (navneet rana) आणि रवी राणा (ravi rana) यांना काल म्हणजेच बुधवारी जामीन मंजूर झाला होता मात्र काही तांत्रिक बाबींमुळे राणा दाम्पत्य बुधवारी जेलमध्येच राहिलं होतं. आता मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर नवनीत राणा जेल बाहेर आल्या आहेत. जेल मधून बाहेर येताच त्या लीलावती रुग्णालयात (lilavati hospital) दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांची गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार केली होती. जेल मधून बाहेर आल्यानन्तर नवनीत राणा या आता वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात गेल्या आहेत. जेलमधल्या जमिनीवर झोपावं लागल्यानं त्यांची मानदुखी बळावली होती. आता लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यात येणार आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असा राणा दाम्पत्याचा हट्ट होता. पण मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्यानंतर राणा दांम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.
नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयानं घातलेल्या अटींनुसार, नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई आहे. तपासात कोणतेही अडथळे आणू नये असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिलेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभनं दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशा अटी न्यायालयाकडून घातल्या गेल्या आहेत.