400 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांना टिपण्याची क्षमता
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आपल्या जहाजावरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओने डिझाईन केलेल्या बूस्टरसह ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील लक्ष्यावर अचूक हल्ला केला. कोलकात्याच्या बॅटलशिपवरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची दोन महिन्यांपूर्वी सुखोईवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनद्वारे (डीआरडीओ) डिझाईन करण्यात आले असून त्यात स्वदेशी तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.
भारतीय नौदलाने रविवारी अरबी समुद्रात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती नौदल अधिकाऱयांनी दिली. क्षेपणास्त्राने अरबी समुद्रात अचूक मारा यशस्वीपणे पूर्ण केला. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी कोलकाता-श्रेणीच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशकातून करण्यात आली. ब्रह्मोस एरोस्पेस क्षेपणास्त्रातील स्वदेशी सामग्री वाढविण्यावर डीआरडीओ सतत काम करत आहे. क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे देशाची आत्मनिर्भरता अधिक बळकट झाल्याचे नौदलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
भारतीय हवाई दलाने डिसेंबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरात हवेतून मारा करणाऱया ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. बंगालच्या उपसागरात तैनात असलेल्या जहाजाच्या लक्ष्यावर सुखोई फायटर जेटमधून ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात आले. समुद्रातील लक्ष्यावरील ही पहिली चाचणी होती. यापूर्वी जमिनीवरील लक्ष्यावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ब्रह्मोसच्या विस्तारित रेंजची मारक क्षमता 400 किमीच्या जवळपास आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मॅक 2.8 किंवा आवाजाच्या तिप्पट वेगाने डागले जाऊ शकते. ब्रह्मोस हे नाव ब्रह्मदेवाच्या ‘ब्रह्मास्त्र’ या शक्तिशाली शस्त्राच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा दावा संरक्षण विभागाकडून केला जात आहे.
भारताने अनेक मोक्मयाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मूळ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताने आपली क्षेपणास्त्र यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक नवीन गोष्टींनी सज्ज केल्यानंतरची आता दुसरी चाचणीही यशस्वी झाली आहे. यापूर्वीही ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, आता समुद्रातील लक्ष्यभेद यशस्वीपणे साधल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आले आहे.
सामरिकदृष्टय़ा भारत मजबूत
ब्रह्मोसच्या या यशस्वी चाचणीमुळे जमिनीवर किंवा समुद्रातील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यासाठी भारताने लक्षणीय क्षमता सिद्ध केली आहे. भविष्यात युद्धाच्या प्रसंगी शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा सुरक्षा दलाला प्राप्त झाली आहे. भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), बीएपीएल आणि एचएएल यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे यश मिळाले आहे.
400 किमीपर्यंतची मारक क्षमता
या क्षेपणास्त्राचा पल्ला 350 ते 400 किमी आहे. याचा सुरुवातीचा पल्ला 290 किमीपर्यंतच होता. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीची शेवटची चाचणी आयएनएस विशाखापट्टणम येथून करण्यात आली होती.
भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक सामरिक महत्त्वाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.
फिलिपाईन्सला ब्रह्मोसचा पुरवठा
फिलिपाईन्स भारताकडून या क्षेपणास्त्रांची खरेदी करत असताना भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी करत आहे. फिलिपाईन्सने आपल्या नौदलासाठी किनाऱयावर तैनात करण्यायोग्य जहाजविरोधी क्षेपणास्त्रांच्या पुरवठय़ासाठी ब्रह्मोस एरोस्पेससोबत करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार भारताकडून त्यांना पुरवठा केला जात आहे.