ऑनलाईन टीम/तरुण भारत
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज ही न्यायालयाकडून (Court) दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, मालिकांच्या जामीन अर्जावर आज ( ३० नोव्हेंबर ) मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला (Bail application rejected) आहे.
दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटलं की, प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची मूळ मालकीण असलेल्या मुनीरा प्लम्बर हिने दिलेला जबाब आणि न्यायालयात सादर केलेले पुरावे परस्परविरोधी आहे. तरी तिचा जबाब पूर्णतः बाजूला ठेवता येणार नाही.