Tarun Bharat

सैन्याकडून नवाज शरीफ यांना मिळणार दिलासा

Advertisements

भूखंड वाटप प्रकरणी निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे नेते इशाक डार हे पाकिस्तानचे नवे अर्थमंत्री होणार आहेत. डार हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातेवाईक असून सध्या लंडनमध्ये राहत आहेत. डार हे पुढील आठवडय़ात देशात परतून अर्थ मंत्रालयाची धुरा स्वीकारणार असल्याची माहिती गृहमंत्री राणा सनुल्लाहने दिली आहे. सत्तारुढ पीएमएल-एन पक्ष सैन्य मुख्यालय अन् सैन्याला स्वतःच्या बाजूने वळविण्यास यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. सैन्याची पक्ष आणि त्याच्या नेत्यांबद्दलची भूमिका आता नरमली आहे. याचमुळे नवाज शरीफ यांना दिलासा मिळवून देण्याची तयारी सुरू आहे.

नवाज यांनी स्वतःला भूखंड वाटपप्रकरणी निर्दोष ठरविण्याची मागणी  करणारा अर्ज केला आहे. हा अर्ज राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो कायद्याच्या अंतर्गत करण्यात आला आहे. कायद्यानुसार 50 कोटी रुपयांपेक्षा कमी भ्रष्टाचाराच्या प्रकरणी एनएबी चौकशी करणार नसल्याची तरतूद आहे. तर आरोप असलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम केवळ 13 कोटी रुपये असल्याचे म्हणत शरीफ यांनी निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली आहे. अशाच प्रकारच्या एका प्रकरणात उत्तरदायित्व न्यायालयाने 3 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नवाज यांनी न्यायालयाकडे सर्व जप्त मालमत्ता परत करण्याची मागणी केली आहे.

डार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होते. शरीफ सरकारमध्ये प्रत्येक भ्रष्ट नेत्याला दिलासा मिळत आहे. डार यांनाही तडजोडीच्या अंतर्गत देशात आणले जात आहे. डार यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शरीफ कुटुंबाच्या विरोधात साक्ष दिली होती असा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

Related Stories

डाळभात नव्हे भिंतींचा चुना खाते महिला

Amit Kulkarni

भारतातील अफगाण दूतावासाचे ट्विटर अकाउंट हॅक

datta jadhav

अमेरिकेत मागील 24 तासात 73,388 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱयाची हत्या

Patil_p

अफगाण दहशतवादी हल्ल्यात अनेक बालके ठार

Patil_p

अध्यक्षीय निवडणूक लढविणार : कान्ये वेस्ट

Patil_p
error: Content is protected !!