राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना देण्यात आले निवेदन
NCP demands action in case of ‘that’ morph photo
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो शिंदे गटातील शितल म्हात्रे यांनी Twitter च्या माध्यमातून पोस्ट केला. सदर कृत्याद्वारा सुळे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतू असून सदर व्यक्तींवर त्वरित कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार शनिवारी २४ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, रत्नागिरी महिला निरीक्षक दर्शना बाबर देसाई, शहर महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, तालुका चिटणीस बाबल्या दुभाषी, महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, पूजा दळवी, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, राकेश नेवगी, संजय नाईक आदी उपस्थित होते.