NCP District Vice President Prof. Condolences to Sandeep Gavas
कसई – दोडामार्ग येथील माजी सैनिक हरिश्चंद्र लक्ष्मण गवस (86) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे, विवाहित मुली असा मोठा परिवार आहे.
श्री. गवस भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सेवा बजावली. कसई – दोडामार्ग सातेरी केळबाई देवस्थानचे गावकर मानकरी होते. गावात त्यांना आदराचे स्थान असून आबा या नावाने ते परिचित होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक संदीप गवस आणि हळबे महाविद्यालय दोडामार्ग मधील लिपिक हरिश्चंद्र (निलेश) गवस यांचे वडील तसेच ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग च्या शिक्षिका दिप्ती गवस यांचे सासरे व निवृत्त पोलीस प्रकाश नाईक यांचे सासरे होत. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साटेली भेडशी / प्रतिनिधी