NCP drew attention to the condition of Mathewada to Panjarwada road
सावंतवाडी शहरातील विविध कामे अर्धवट असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील पांजरवाडा ते माठेवाडा जोडणारा पुलाचा रस्ता अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना चालत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल . असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी राकेश नेवगी यांनी दिला आहे
सावंतवाडी शहरातील माठेवाडा ते पांजरवाडा दरम्यानचारस्ताही खड्डेमय झाला असून या मार्गावर नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणारा रस्ता नसल्यामुळे नागरिकांना चालत जाताना त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर दुचाकी व चार चाकी वाहनेही यावरून जाताना तारेवरची कसरत होत आहे सावंतवाडी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून नाल्यावर सिमेंट काँक्रीटच्या पूल उभारण्यात आला आहे. मात्र याला जोडणारा रस्ता नसल्यामुळे गेले दोन वर्षे या मार्गावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता होण्यासाठी येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यानंतर सुरुवातीला रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्याला सिमेंट काँक्रेट ने बुजवण्यात आले कमकुवत झालेला नवा पूल उभारण्यात आला आता पुल झाला मात्र त्याला जोडणारा रस्ता अजूनही अपूर्ण आहे.पांजरवाडा ते माठेवाडा हा रस्ता आधीच रुंद असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी राकेश नेवगी यांनी केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी