Tarun Bharat

राष्ट्रवादीकडून भाजपला मदत; लवकरच परिणाम दिसतील; पटोलेकडून सूचक विधान

नागपूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असून त्याची तक्रार पक्षश्रेष्टीं यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीकडून भाजपाला ताकद दिली जात आहे. असे गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत. येत्या काही दिवसांत याचे परिणाम दिसतील असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहेत. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

एका माध्यमाकडे बोलताना. गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वागत आहेत ते चुकीचे आहे. निधी वाटप, भंडारा गोंदिया जिल्हा परिषद, अमरावती बँक वरून राष्ट्रवादीची भूमिका पाहता ती काँग्रेसला अडचणीत आणणारी आहे. याची तक्रार आम्ही काँग्रेस पक्षाकडे केली आहे. केवळ भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आलो. पण भाजपाला ज्या पद्धतीने राष्ट्रवादी साथ देत आहे, तर येणाऱ्या काळात याचे परिणाम दिसतील. सत्तेत राहायचे का? नाही हे पक्षश्रेष्टीं सांगतील असे सूचक विधान नाना पटोले यांनी केले.

Advertisements

Related Stories

आर्वीच्या तरुणाचा वाघेरी फाटा येथे खून

Patil_p

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

datta jadhav

`पुनर्वसन’च्या गैरकारभाराला चाप लावणार – आ. प्रकाश आबिटकर

Abhijeet Shinde

सोफिया केनिनवर शस्त्रक्रिया

Patil_p

सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत आज जिल्हा दौऱ्यावर

NIKHIL_N

सांगली : महापौर, उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारी जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!