Tarun Bharat

सत्ता गेल्यावर विरोधी बाकावरच बसावं लागणार- जयंत पाटील

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शरद पवार (ncp leader sharad pawar) यांच्यासोबत आमची बैठक झाली त्यामध्ये तीन दिवसात घडलेल्या घटनेवर चर्चा झाली. यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत (shiv sena) राहणार आहे. शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबत ठाम उभे असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (ncp president jayant patil) पत्रकारांसमोर दिला. याचबरोबर सरकार पडल्यास विरोधी बाकावर बसण्यासाठी तयारी करावी लागत नाही सरकार पडल्यास विरोधी बाकावर नक्कीच जावे लागेल असेही जयंत पाटील म्हणाले. (Ncp Jayant Patil) त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं.

शिवसेना मविआतून बाहेर पडण्याबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. काल शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर त्यांच्यात यावर चर्चा झाली नाही. आज शिवसेनेने जे विधान केलं आहे, गुहावटीमध्ये जे आमदार आहेत त्यांनी मुंबईत येऊन बोलावं. त्यांच बोलणं ऐकूण घेऊन काय तो निर्णय घेऊ असे सूतोवाच सेनेनं केलं आहे. त्यामुळे ते आमदार मुंबईत परत आल्यावर काय होतंय ते पाहू, असे जयंत पाटील म्हणाले.

Advertisements

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या गोटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

पुढे माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे सोबत जे गुहावटाला गेले आहेत, त्यांनी उध्दव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. पक्ष सोडण्याचं कोणतही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. मुंबईत परतल्यानंतर त्यांची बैठक होत असेल आणि त्याआंतर्गत चर्चा झाली तर विचार करु, आता यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

तसेच संजय राऊतांच्या विरोधी बाकावर बसण्याच्या वक्तव्यावर माध्यमांनी विचारलं असता पाटील यांनी, सत्ता गेल्यावर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेलं विधान हे अंतर्गत चर्चा करून आणि विचार करून केलं असेल. त्यामुळे आता यावर विचार करायची काही गरज नाही. शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतर यावर विचार करू असाही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : शिवसेना ‘मविआ’तून बाहेर पडणार पण… राऊतांचे मोठं वक्तव्य

Related Stories

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.10 %

Rohan_P

ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्या आमदारकीसाठी शिफारस करणार

Abhijeet Shinde

यंदा प्रथमच धावणार नाही ‘देवाची गाडी’

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी पाऊस

Abhijeet Shinde

विद्यामंदिर नरंदेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

tarunbharat

मिरजेत आमदार पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!