Tarun Bharat

बारामतीत सूर्य पश्चिमेकडे उगवेल; पण पवारांना…; जयंत पाटलांकडून भाजपचा समाचार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत (Baramati) आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपाला होत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंचं मंत्री गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर; म्हणाले, गोधडी शब्दाचा वापर…

बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे, शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. असं वातावरण तयार करायचं की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय, अशी भाजपची मीडियासमोर जाण्याच्या पध्दती आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडेन त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

Related Stories

EC 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता

Abhijeet Khandekar

पंतप्रधान मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक संपली

Archana Banage

नियमित कर्जदारासाठी स्वाभिमानीचा एल्गार

Archana Banage

तुझं माझं करू नका,एकसंघ व्हा, तरच आरक्षण मिळेल – समरजितसिंह घाटगे

Archana Banage

प्रशासकीय यंत्रणांनी पाऊस काळात सतर्क रहावे

Patil_p

शेंदूरजणेत 1 हजार 600 जिलेटीन कांडय़ा जप्त

Patil_p