Tarun Bharat

एसटी बस चालवणे गुन्हा असेल तर माझ्यावर कारवाई करा : जयंत पाटील

Advertisements

सांगली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर उत्साहात साजरा होत असताना त्या दिवशी एसटी बस चालवून मी जर गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी. असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विरोधकांना दिले.

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत असताना यात एसटी महामंडळाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनी विनंती केल्यामुळे मी बस चालविली. शि‍वाय माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही आहे. एसटी बस चालवून मी जर काय गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी असे म्हणाले.

माझ्याकडे लायसन्स… कारवाई करा-
जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी एसटीचं सारथ्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एसटी चालवण्याचं लायसन्स आहे की नाही, यावरुही सवाल उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, लायसन्स माझ्याकडे आहे, असं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. ‘कायद्याने काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करवी. मी चुकलो असेन तर माझ्यावर कारवाई करावी’, असंही ते म्हणाले आहेत. एका लोकप्रतिनिधीने एसटीचं सारथ्य केल्यामुळे सर्वसामान्यांना आनंद झाला होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.

Related Stories

धर्मांध शक्तींला बाजूला ठेवा-शरद पवार

Abhijeet Shinde

आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात – आरोग्य मंत्री टोपे

Abhijeet Shinde

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा -उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

सांगली : पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – पालकमंत्री

Abhijeet Shinde

विट्यात चारचाकी पेटल्याने भाजी विक्रेत्याचा होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde

शेतकरी आंदोलनाला मिरज शहरात पाठिंबा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!