Tarun Bharat

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल

Advertisements

ऑनलाईन टिम नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ भाजप अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. द्रौपदी मुर्मू यांच्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुमोदन दिले आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने मंगळवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव एनडीएचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. आज दुपारी द्रौपदी मुर्मू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुमोदन आहे.

द्रौपदी मुर्मू यांनी कालच नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. अर्ज दाखल करतेवेळी इतर ज्येष्ठ मंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश या भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच एनडीएचे खासदार, आमदार आणि इतर नेतेही नामांकन सोहळ्याला उपस्थित होते.

Related Stories

तात्काळ किव्ह सोडा; भारतीय दुतावासाची ॲडवायजरी जारी

datta jadhav

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन! म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही…

Abhijeet Khandekar

सोलापुरात आणखी चार रुग्ण वाढले; कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 वर

Abhijeet Shinde

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

शरद पवारांवर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

Abhijeet Shinde

संरक्षित स्मारकांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत फ्री एन्ट्री

Patil_p
error: Content is protected !!