Tarun Bharat

हायड्रोजन क्षेत्रात 150 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे संकेत

दहा वर्षांत सदरची गुंतवणूक शक्य ः आरआयएलच्या अधिकाऱयांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) मधील न्यू एनर्जी या विभागाचे अध्यक्ष कपिल माहेश्वरी यांनी आगामी दहा वर्षाच्या कालावधीत हायड्रोजन उद्योगामध्ये लाखो लोकांना रोजगार दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. या कामगिरी करता जवळपास 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

यावेळी माहेश्वरी यांनी हायड्रोजन क्षेत्राच्या गुंतवणुकीच्या क्षमतेसह भारतात अगोदरच हा बाजार 60 ते 70 लाख टन हायड्रोजनची बाजारपेठ असल्याचे सांगत यापुढे विकासाला संधी आहे, असे सांगितले.

आगामी काळात हे क्षेत्र तेजी घेणार

आगामी दहा वर्षांच्या दरम्यान या क्षेत्रात 150 ते 200 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आल्यास त्याचा लाभ हा आगामी काळात उद्योग क्षेत्राला होणार असल्याचा दावा अधिकारी माहेश्वरी यांनी केला आहे.

Related Stories

‘झोमॅटो’ला दुसऱया दिवशीही प्रतिसाद

Amit Kulkarni

नेक्सॉन-क्रेटाच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Patil_p

मोटोरोला फोल्डेबल 5 जी फोन सादर करण्याच्या तयारीत

Patil_p

जॉयआलुक्कासचा येणार आयपीओ

Patil_p

किरकोळ व्यावसायिक सरकारच्या पाठिशी

Patil_p

फेब्रुवारीत वाहन नोंदणी घटली

Patil_p