तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या आतापर्यंत 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे.आधी जपानमधील फुकूशिमा आपत्तीमधील मृतांचा आकडा मोठा होता.दरम्यान,तुर्की-सीरियातील भूकंपामुळे झालेल्या मृतांचा आकडा फुकूशिमामध्ये झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. ही माहिती असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिली आहे. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. अनेक लहान मुले, वृध्द एवढेच नाही तर काही प्राणीही यातून सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे.
काल भारतातून पाठवण्यात आलेल्या टीमने सहा वर्षीय मूलीला सुखरूप बाहेर काढले याचा व्हिडिओ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत शेअर केला आहे. तसेच NDRF टीमचे कौतुक केले आहे. तुर्कीतील बचाव कार्यात टीम IND-11 ने गॅझियानटेप शहरातील बेरेन या सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली NDRF ला जगभरातील अव्वल दर्जाचं आणि आघाडीची आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. #OperationDost असा हॅश टॅगही दिला आहे.