Tarun Bharat

फौंड्री उद्योगात डिजिटलायझेनची गरज

भारत फोर्जचे कार्यकारी संचालक बी. पी. कल्याणी यांचे वेस्कॉन उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

प्रतिनिधी/कोल्हापूर

सद्य स्थितीत सर्व क्षेत्रात डिजिटलायझेनची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. फौंड्री उद्योगासह इतर उद्योगामध्ये प्रत्येकांनी डिजिटलायझेनच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता वाहन उद्योगात ईलेक्ट्रीक व्हेईकल (ईव्ही)चा वापर जलद गतीने अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वेस्कॉन परिषदेचे प्रमुख पाहुणे भारत फोर्ज, पुणेचे कार्यकारी संचालक बी. पी. कल्याणी यांनी केले.
दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन (आयआयएफ) कोल्हापूर चॅप्टर व पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , ‘वेस्कॉन डिजिटलायझेशन 2022 – बदलाचे नवीन युग‘ या दोन दिवसीय पश्चिम प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या दोन दिवशीय परिषदेचा प्रारंभ शनिवारी हॉटेल सयाजीमध्ये झाला. मुख्य अतिथी म्हणून ब्रेक्स इंडिया लि चेन्नईचे माजी कार्यकारी संचालक व्ही. नरसिंहन हे होते. यावेळी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा अनुजा शर्मा, कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश राठोड व परिषदेचे संयोजक समीर पारीख हे उपस्थित होते.

मुख्य अतिथी व्ही. नरसिंहन यांनी आपल्या मार्गदर्शनात, उपस्थितांना, गतिशील आधारभूत माहितीबाबतचे विश्लेषण केले. डेटा एकत्रित करण्यासाठी एक मापदंड ठरवावा असे सांगून, सर्वांनी ऊर्जेची बचत करावी असा मोलाचा सल्ला दिला. मुख्य वक्ते इंडोशेल कास्ट प्रा. लि., कोईम्बतूरचे व्यवस्थापकीय संचालक जे. गणेश कुमार यांनी, मनुष्यबळाचे नियोजन, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, पुनरावलोकन आदी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. अनुजा शर्मा यांनी आपण परदेशी फौंड्रीपेक्षा कमी नसल्याचे सांगितले. आयआयएफ कोल्हापूर चॅप्टरला भविष्यात यशाच्या नवीन स्तरांवर पोहोचण्यास मदत करेल असे प्रतिपादन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केले. सचिन शिरगावकर म्हणाले डिजिटलायझेशन या प्रवासामध्ये प्रवेश करण्याशिवाय आपल्याला पर्याय नसल्याचे सांगितले.

उद्घाटन सोहळ्याला उपाध्यक्ष महेश दाते, कोषाध्यक्ष राहुल पाटील, ज्येष्ठ उद्योजक नरेंद्र झंवर, व्ही. एन. देशपांडे, प्रभाताई कुलकर्णी रवींद्र पाटील, समीर पाटील, सुमित चौगुले, एम. बी. शेख, गुप्ता, प्रयुत भामावत, सोमाणी,,आयआयएफ अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, इंदोर, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील साडे तीनशेहून अधिक सभासद, फौंड्री उद्योजक, उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रयुत भामावत यांनी आभार मानले.

मान्यवरांचे विविध विषयावर मार्गदर्शन
परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘फाउंड्री उद्योगात डिजिटलायझेशनची गरज‘ ( मेनन अँड मेनन लि., कोल्हापूर चे व्यवस्थापकीय संचालक विजय मेनन), ‘डिजिटलायझेशनसाठी एक धोरणात्मक दिशा‘ (यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा. लि., औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कंक), ‘डिजिटलायझेशन ः फाउंड्रीमेनचा दृष्टीकोन‘ एक्सपर्ट (ग्लोबल सोल्युशन्स, औरंगाबादचे संचालक मुकुंद कुलकर्णी), ‘ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठी डिझिटलायझेशन‘ (सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक व्ही श्रीनिवास रेड्डी), ‘व्यवसाय वाढीवर‘ ( व्हीपी, थिसेन क्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागेशकर), ’लघु उद्योजकांची क्षमता वाढवणे’ (सीएमआरएस आणि असोसिएट्स एलएलपीचे महेश्वर मराठे)

Related Stories

वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप; तांत्रिक बिघाडामुळे होतोय विलंब

Archana Banage

विद्यार्थी भवन सुवर्ण महोत्सव स्मरणिका काढण्यास मान्यता

Archana Banage

मार्चपर्यंत अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती- मंत्री जोतिरादित्य सिंधिया

Abhijeet Khandekar

वादळी वाऱ्यात उध्वस्थ झालेला किणी टोल नाका पुन्हा कार्यरत

Archana Banage

कोडोलीचे तीन भागात विभाजन : बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी

Archana Banage

अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाचा हातोडा

Archana Banage