Tarun Bharat

तालुक्यात पुन्हा घोणस अळी निदर्शनास

Advertisements

शेतकऱयांमध्ये धास्ती, प्रतिबंधक औषधांची गरज :  कृषी खात्याने योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता

प्रतिनिधी / बेळगाव

तालुक्मयात घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील आठवडय़ात कर्ले येथील शिवारात घोणस अळी आढळून आली होती. त्या पाठोपाठ आता नंदिहळ्ळी शिवारातदेखील आढळून आल्यामुळे शेतकऱयांची भीती वाढली आहे. तालुक्मयात यंदा प्रथमच या अळी निदर्शनास आल्याने याबाबत कृषी खात्याने तात्काळ पावले उचलून शेतकऱयांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत
आहे.

महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये या अळीने धुमाकूळ घातला होता. आता बेळगाव तालुक्मयातदेखील या अळीचा शिरकाव झाल्याने शेतकऱयांसमोर चिंता वाढली आहे. ही अळी शेतकऱयांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तात्काळ यावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही शेतकऱयांतून होत आहे.

कर्ले, नंदिहळ्ळी परिसरात अळी आढळल्याने भीती

कर्ले, नंदिहळ्ळी भागात ही अळी आढळून आली असली तरी इतर ठिकाणी देखील या अळीचा प्रादुर्भाव असल्याचे बोलले जात आहे. भात, ऊस आणि इतर पिकांवर देखीलही अळी आढळून आली
आहे.

पिकासाठी धोकादायक नसली तरी शेतकऱयांना मात्र ही धोकादायक ठरू शकते. यासाठी तात्काळ प्रतिबंधक औषधांच्या फवारणीची गरज आहे. खरीप हंगामातील बटाटा, रताळी, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यातच घोणस अळीचे दर्शन झाल्याने शेतकऱयांची चिंता वाढली
आहे. 

दरम्यान शेतकऱयांना या अळीचा स्पर्श होणार नाही. याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र पानाखाली असलेली ही अळी शेतकऱयांच्या नजरेला न पडताच स्पर्श झाल्यास धोका उद्भवू शकतो. त्यासाठी या अळीचा समूळ नाश करण्यासाठी कृषी खात्याने प्रतिबंधक औषधे उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कुडची पोलिसांकडून चोरटय़ांची टोळी जेरबंद

Amit Kulkarni

गणेबैलनजिक बस – स्कॉर्पिओ अपघातात एक ठार

Patil_p

लुटारूंकडून ग्रामीण भागातील बँका ‘लक्ष्य’

Omkar B

पावसामुळे पुरातन वस्तु खराब होण्याची भीती

Patil_p

हाडांच्या आजारांबाबत शनिवारी शिबिर

Amit Kulkarni

आयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni
error: Content is protected !!