वार्ताहर /लतांबरसे
आजकाल ऑक्सिजनची भासणारी कमतरता भरून काढायची असेल तर सीडबॉलसारखे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे. झाडाची जेवढी कत्तल केली जाते त्याहून दुप्पट झाडे आपण लावली पाहिजे तरच आपले पुढचे आयुष्य चांगले जाईल असे उद्गार प्रसिद्ध पर्यावरण प्रेमी रमेश गावस यांनी सरकारी प्राथमिक विद्यालय – खरपालच्या सीडबॉल वितरण कार्यक्रमाच्या वेळी काढले.
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सीडबॉलचे वितरण लाडफे म्हावळि?गे येथील इंडो आर्या या आस्थापनामध्ये करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडफे म्हावळींगे येथील इंडो आर्या पार्किंग व्यवस्थापन पाहणारे राहुल माजीक, सरकारी प्राथमिक विद्यालय खरपालचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष निलेश गावस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिमा गावस, पालक संजना गावस,आरती गावस, जनार्दन माटणेकर ,सर्वेश गावस, ज्ञानेश्वर गावस आदी पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका प्रज्ञा दिनेश दामले यांनी सीडबॉल बनवण्याची प्रक्रिया, त्याचा प्रवास व त्या मागचा हेतू कथन केला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ट्रक ड्रायव्हर उपस्थित होते .सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना शैलेश राऊत यांनी केले तर आभार शिक्षक गौरेश परवार यांनी मानले.