Tarun Bharat

जीवन सुंदर बनविण्यासाठी झाडे लावण्याची गरज

समाजसेवक  समिल वळवईकर यांचे प्रतिपादन : कुंभारजुवे शारदा सरकारी विद्यालयात वनमहोत्सव

प्रतिनिधी /पणजी

मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्याने निसर्गात होणारा बदल यावर उपाय म्हणजे मोठय़ा प्रमाणात झाडे लावून वनमहोत्सव साजरा करायला हवा. मोठय़ा प्रमाणात झाडे लावून हवामान समतोल राखण्यासाठी आणि आवाजावरील प्रदूषणावर मात करण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. आपले जगणे सुंदर बनण्यासाठी झाडे लावावी, असे आवाहन कुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक समिल वळवईकर यांनी केले.

 कुंभारजुवे येथील श्री शारदा सरकारी विद्यालयात वनमहोत्सव झाडांची रोपटी लावून साजरा करण्यात आला. यावेळी वळवईकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत श्री शारदा सरकारी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रायकर, पंचसदस्य प्रशांत भांडारे, सुरेंद्र नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला पोतेकर आणि पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा सावंत उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व मुलांच्या सुस्वागतम गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पंच प्रशांत भांडारे व पंच सुरेंद्र नाईक यांची समयोचित भाषणे झाली. मुख्याध्यापिका उज्वला पोतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आदित्य हळर्णकर याने केले तर शिक्षक योगेश जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

आजपासून मासेमारी बंदी

Omkar B

ऊसाच्या रकमेचा पहिला हप्ता ताबडतोब चुकता करावा

Omkar B

गोव्यात 41 वेलनेस केंद्रे सुरू करणार

Amit Kulkarni

चोपडेतील खाजन पूर्ववत करा

Amit Kulkarni

शाळा 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याच्या हालचाली

Patil_p

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारपासून गोवा दौऱयावर

Amit Kulkarni