Tarun Bharat

पवारांना युपीए अध्यक्ष करा, गोऱ्हेंचा सल्ला

मुंबई/प्रतिनिधी
Advertisements

शरद पवार (sharad pawar) मुख्यमंत्री असते तर राज्यात वेगळी परिस्थिती असती असे वक्तव्य अमरावती (amravati) येथे करणाऱ्या काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव देण्याचा सल्ला दिला आहे.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी अमरावती येथे शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे. ते आपल्या सोबत आहेत, म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही व्यक्त केला होता. अमरावतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री सुनील केदार (sunil kedar) मंचावर उपस्थित होते.

या वक्तव्याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद राव पवार यांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेबाबत कोणती शंकाच नाही. मला तर वाटते पवार यांना यूपीएचे अध्यक्ष केले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण भारतालाच त्यांचा उपयोग होईल. असा प्रस्ताव यशोमती ताई तुम्ही द्याल का? असा सवालही त्यांनी केला आहे. महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्ये आणि त्यामुळे निर्माण होणारा बेबनाव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

Related Stories

टोप-शियेफाटा येथील अतिक्रमणावर कारवाई

Sumit Tambekar

मराठा आरक्षणासाठी लवकरच घेणार पंतप्रधानांची भेट – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कृषी कायद्याविरोधात रहिमतपूर बंद

Patil_p

केंद्र सरकारचे नियम तंतोतंत पाळणे गरजेचे : शरद पवार

prashant_c

मोफत शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ!

Rohan_P

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!