ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने 88.13 मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावले. नीरजच्या या कामगिरीने भारताने 19 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला असून, तो या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
नीरजने भालाफेकीच्या अंतिम फेरीची सुरूवात केली. अन् पहिल्याच प्रयत्नात त्याने फाऊल केला. दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर तर तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर थ्रो करत आपली कामगिरी सुधारली. या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर थ्रो केला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला. या कामगिरीवर त्याने रौप्यपदकावर आपली दावेदारी सांगितली.
या स्पर्धेत ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकलं. त्यानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर थ्रो केला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने 88.09 मीटर भालाफेक करत कांस्यपदक पटकावले.
हेही वाचा : चंद्रकांतदादा बोलले त्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना; पण भाषण बाहेर आलंच कसं?