परीक्षार्थींची चोख तपासणी : पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरून घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी पार पडली. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पीएसआय परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव जिल्हय़ात सुरळीत पद्धतीने नीट परीक्षा पार पडली.
देशातील 497 शहरांमध्ये रविवारी नीट परीक्षा घेण्यात आली. दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत परीक्षा पार पडली. जिल्हय़ातील मोजक्मयाच परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. गणेशपूर रोड येथील गुडशेफर्ड शाळेत परीक्षा घेण्यात आली. हॉल तिकीट, आधारकार्ड व दोन फोटो याव्यतिरिक्त इतर सर्व साहित्य बाहेरच ठेवण्याची सूचना पर्यवेक्षकांकडून देण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थिनी हिजाब घालून परीक्षा केंद्रावर आल्या होत्या. त्यांना हिजाब काढून परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात आला.