डॉ. एम. एम. गोयल यांचे प्रतिपादन : भ्रष्टाचार-लोभाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
भारतात सध्या उद्भवलेल्या आर्थिक व अन्य समस्यांवर ‘निडोनॉमिक्स’ अर्थव्यवस्था हे उत्तर आहे.
निडोनॉमिक्सचा अर्थ ‘गरजेचे अर्थशास्त्र’ असा असून या अर्थशास्त्राच्या आधारे पुढील काळात आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करावी लागणार आहे, असे विचार ‘निडोनॉमिक्स स्कूल ऑफ थॉट’चे जाणकार प्रा. डॉ. एम. एम. गोयल यांनी व्यक्त केले.
नॅक कमिटीचे चेअरमन असलेले डॉ. गोयल सध्या आरपीडी कॉलेजच्या मूल्यांकनासाठी आले आहेत. त्यानिमित्ताने निडोनॉमिक्स अर्थशास्त्राबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आज देशात हिंसा, दहशतवाद, शोषण, भेदभाव, असंतोष आहे. याचे कारण भ्रष्टाचार आणि अधिक लोभ होय. यातून अनेक समस्या उद्भवतात, ज्या अर्थव्यवस्थेवर नकळत परिणाम करतात. अमर्याद हव्यास हा या जगाला भेडसावणारा मोठा धोका आहे. जागतिक राजकारणावर वेगळा ठसा उमटविणाऱया अमेरिकेचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. याचे आकलन होण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. ग्रिडोनॉमिक्स म्हणजेच अधिक हव्यास असणाऱयांचे शास्त्र हे सर्वांनाच संपवू शकते, अशी शक्मयताही त्यांनी व्यक्त केली.
निडोनॉमिक्स या शास्त्राचा जन्म हा भगवद्गीतेतून झाला आहे. आपल्याला भगवद्गीता कळाली. पण त्यामागचे अर्थशास्त्र कळालेले नाही. या देशात कुपोषणामुळे होणाऱया मृत्यूपेक्षा अन्नाच्या अतिसेवनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. यावर गरजेपुरते खाणे व गरजेपुरतीच संपत्ती जमविणे हा रामबाण उपाय आहे, असेही ते म्हणाले.
मध्यमवर्गीय गरिबीच्या खाईत लोटले जाऊ नयेत, यासाठी निडोनॉमिक्स अर्थशास्त्र अंमलात आणले पाहिजे. सध्या उद्भवलेल्या सर्व आर्थिक समस्यांना उत्तर देण्याचे सामर्थ्य या संकल्पनेत असल्याचे डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले.