Tarun Bharat

नेपाळ-भारताचे नाते हिमालयासारखे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा ः बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष दौरा ः सहा करारांवर स्वाक्षऱया

लुंबिनी / वृत्तसंस्था

Advertisements

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नेपाळला भेट दिली. आपल्या सहा तासांच्या या दौऱयात नेपाळमधील लुंबिनी येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. दोन्ही देशांमधील संबंध हिमालयासारखे दृढ आणि उच्च असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दोन्ही देशांची जनता हे नाते अधिक मजबूत करेल. तसेच नव्या उंचीवर नेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी सहा करारांवर स्वाक्षऱया केल्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यात दुपारी द्विपक्षीय चर्चा झाली आहे. या चर्चेत दोन्ही देशांची शिष्टमंडळेही सहभागी झाली होती. दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. दोघांच्या उपस्थितीत लुंबिनीच्या बौद्ध विद्यापीठात भारतीय प्राध्यापकांच्या नियुक्तीसह अनेक महत्त्वाचे करार झाले. तसेच दोन्ही देशांमधील करारानुसार विद्यापीठात इंडिया चेअरची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत बौद्ध विषय शिकवण्यासाठी एका भारतीय प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. लुंबिनी बौद्ध विद्यापीठात सेमिस्टर शिकवण्यासाठी दरवषी एका भारतीय प्राध्यापकाची नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. ‘इंडिया चेअर’च्या स्थापनेसाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि लुंबिनी बौद्ध विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. नेपाळचे पंतप्रधान देउबा आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय दूतावासाचे वरि÷ अधिकारी, लुंबिनी बौद्ध विद्यापीठाचे अधिकारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या. विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अभ्यासाला चालना देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले.

मोदींनी व्यक्त केली समाधानाची भावना

नेपाळच्या विकासात भारत खांद्याला खांदा लावून काम करत आहे याचे मला समाधान आहे. मायादेवी मंदिराला भेट देण्याची मला मिळालेली संधी ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भगवान बुद्धांचा जन्म ज्याठिकाणी झाला तेथील चैतन्य आश्चर्यकारक आहे. 2014 मध्ये लावलेल्या रोपटय़ाचा आता वृक्ष झाल्याचे पाहून मोदींनी समाधान व्यक्त केले. तसेच सदर वृक्षाला त्यांनी पाणीही घातले.

नेपाळने मला आध्यात्मिक आशीर्वाद दिले आहेत. नेपाळशिवाय आपला रामही अपूर्ण आहे. आज अयोध्येत रामजींचे मंदिर बांधले जात असल्यामुळे नेपाळमधील लोकही भारतावर खूश आहेत. नेपाळ हा एक सांस्कृतिक आणि पर्वतीय प्रदेश आहे. हजारो वर्षांपासून नेपाळकडे या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. भारतालाही असे वाटणे साहजिक आहे. ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. शतकानुशतके भारत आणि नेपाळमध्ये बौद्ध शिक्षणाची केंदे असून ती अधिक विकसित करण्यासाठी दोन्ही देश भविष्यातही तत्परता दाखवतील, असे मोदी म्हणाले.

विविध वारसा केंद्रांची पायाभरणी

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी विकास आणि कनेक्टिव्हिटीसारख्या मुद्यांवर चर्चा केली. याशिवाय सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याशी संबंधित सहा करारांवर स्वाक्षऱया केल्या. भारताच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱया बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राची त्यांनी पायाभरणी केली. या केंद्रात बौद्ध परंपरेवर अभ्यास केला जाणार आहे. नेपाळला पोहोचल्यावर पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. दोन्ही पंतप्रधानांनी मायादेवी मंदिरात पूजा केली. त्यांनी मंदिरातील मार्कर स्टोनलाही श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पुष्करणी तलावाला प्रदक्षिणा घातली.

Related Stories

नववर्षारंभी मिळणार ‘किसान सन्मान’चा हप्ता

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 4 जी सेवा नाही

Patil_p

चार कामगार कायदा संहिता लागू करणार

Patil_p

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती”: गडकरी

Abhijeet Shinde

जयपूरमध्ये समूह संसर्गाचा धोका

Patil_p

‘आयएनएस कोची’ची अरबी समुद्रात चाचणी

Patil_p
error: Content is protected !!