प्रतिनिधी /मडगाव
संगीता हरियाल (24) ही आपल्या चार वर्षीय मुलीसह मडगाव येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती ठाकूर पौडय़ाल यांनी 22 फेब्रुवारी 2002 रोजी मडगाव पोलीस स्थानकात नोंद केली होती. गेले सहा महिने या महिलेचा व तिच्या छोटय़ा मुलीचा तपास लागलेला नाही. संगीता व ठाकूर हे दोघे नोकरीनिमित्त गोव्यात आले होते.
संगीता हरियाल हिचा पती ठाकूर पौडय़ाल हा हॉटेलात शेफ म्हणून काम करीत होता व आकें-मडगाव येथे हॉटेल मालकाने त्याला एक राहण्यासाठी खाली दिली होती. संगीता ही मोती डोंगर तसेच आकें परिसरातील काही घरांनी साफ सफाई करणे, भांडी धुणे इत्यादी कामे करायची.
आपली पत्नी मोबाईलवर ‘टिकटॉक’ व्हिडिओ बनवायची. हा प्रकार अयोग्य असून तो बंद करावा असे आपण सांगितल्याने ती काहीशी नाराज झाली होती. आपण हॉटेलात कामावर गेलो असताना ती घरातून गायब झाल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. तिचे कुणाकडे प्रेम प्रकरण नव्हते. तसेच ती आपली छोटी मुलगी, आपली आई तसेच पती म्हणून आपलीही बऱयापैकी काळजी घेत होती. मात्र, ती अचानक गायब झाल्यानंतर आपण पोलीस तक्रार नोंद केली, मडगाव पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिचे मोबाईलवरील कॉल्स डिटेल्स घेतले. पण, तिचा कुणाकडे विशेष संपर्क नव्हता हे स्पष्ट झाल्याचे त्यांने सांगितले.
पत्नी नेपालमध्ये गेली असेल म्हणून आपण नेपालमध्ये सुद्धा जाऊन तिचा शोध घेऊन आलो. पण, तिचा ठावठिकाणा लागलेला नाही अशी माहिती त्याने दिली.
घरातून बाहेर पडताना तिने मोबाईल तसेच पैसे देखील सोबत नेले नव्हते. अशी माहिती ठाकूर पौडय़ाल यांनी दिली आहे.