Tarun Bharat

नेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ डब्लीन

23 वर्षांखालील वयोगटाच्या पाच देशांच्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलँडस्ने (हॉलंड) भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

हा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात हॉलंडतर्फे बेलेन व्हॅन डेर ब्रुकने 26 व्या मिनिटाला, अंबेर ब्रोव्हेरने 31 व्या मिनिटाला, इमा सँटेब्रिंकने 53 व्या मिनिटाला आणि सॅने हॅकने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतातर्फे एकमेव गोल ब्युटी डुंगडुंगने 29 व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. भारताच्या तुलनेत हॉलंडचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाल्याने भारतीय बचावफळीवर शेवटपर्यंत दडपण आल्याचे जाणविले.

Related Stories

40 वर्षांनंतर ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत!

Patil_p

पोर्तुगालचा रायडर गोन्साल्वेस अपघातात ठार

Patil_p

दिवगंत फुटबॉलपटू प्रँको यांना एएफसी प्रमुखांची श्रद्धांजली

Patil_p

अपयशाच्या गर्तेतील भारतासमोर आज अफगाणचे आव्हान

Patil_p

डेन्मार्कचे मॉल्डोव्हावर 8 गोल

Patil_p

आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!