वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम
यजमान नेदरलँडस् (हॉलंड) आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका हॉलंडमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी नेदरलँडस् क्रिकेट संघटनेने 15 जणांचा संघ जाहीर केला. या मालिकेसाठी पाकचा संघ शनिवारी हॉलंडमध्ये दाखल झाला.
पाक आणि हॉलंड यांच्यातील हे तीन वनडे सामने 16, 18, 21 ऑगस्ट रोजी रोटरडॅमच्या हॅजलेनवेग स्टेडियममध्ये खेळवले जातील. आयसीसीच्या वनडे सुपर लिग अंतर्गत ही वनडे मालिका राहिल. 2023 च्या भारतात होणाऱया आयसीसीच्या पुरुषांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सध्या विविध ठिकाणी पात्र फेरीची स्पर्धा घेतली जात आहे. आयसीसीच्या मानांकनातील आघाडीचे सात संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. यामध्ये यजमान भारताचाही सहभाग आहे. पाकविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी हॉलंडचे नेतृत्व स्कॉट एडवर्डस्कडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये अनुभवी आणि वयस्कर 38 वर्षीय वेस्ले बॅरेसीचा समावेश करण्यात आला आहे.
नेदरलँडस् संघ- स्कॉट एडवर्डस् (कर्णधार), मुसा अहमद, शेरीझ अहमद, वेस्ले बॅरेसी, लोगेन व्हॅन बेक, कुपर, आर्यन दत्त, अमाव जैन, किंगमा, क्लेन, डिलेडी, निडामेनुरु, प्रिंगल, मॅक्स ओ दाऊद, विक्रम सिंग.