Tarun Bharat

नवी ऑडी क्यू 3 स्पोर्ट्बॅक कार लाँच

नवी दिल्ली

लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडी इंडियाने भारतात आपली पहिली नवीन कार, एंट्री-लेव्हल कूप एसयूव्ही क्यू 3 स्पोर्ट्बॅक लाँच केली आहे. नवीन मॉडेलची  एक्स-शोरूम किंमत 51.43 लाख रुपये आहे. खरेदीदार 2 लाख रुपयाचे टोकन घेऊन कार प्री-बुक करू शकतात अशी माहिती कंपनीने दिली आहे.

नवीन 2023 ऑडी क्यू 3 स्पोर्ट्बॅक टर्बो ब्लू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथॉस ब्लॅक आणि ब्लू रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. कार सिंगल पूर्ण लोडेड टेक्नॉलॉजी एस लाईन ट्रिममध्ये ऑफर केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात क्यू 3 दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली होती.

फिचर्स : इंजिन गिअरबॉक्स : सर्व प्रकारांमध्ये 2.0 लिटर टीएफएसआय टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर मिळते जी 190 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की कार 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करते. सिस्टम 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, 10-स्पीकर साउंड सिस्टमसारख्या सुविधा या गाडीत आहेत. याशिवाय सहा एअरबॅग्ज देण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

नव्या वर्षी मारुती सुझुकीच्या कार्स महागणार

Amit Kulkarni

होंडा सीबी 350 आरएस भारतात लाँच

Amit Kulkarni

‘टाटा’ची नवीन कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार बाजारात

Patil_p

टियागोला बुकिंगमध्ये जोरदार प्रतिसाद

Patil_p

एमजी मोटर्सची ऍस्टर याच महिन्यात

Amit Kulkarni

वोल्वो कारची किरकोळ विक्री 2021 मध्ये 27 टक्के वाढली

Patil_p