म्हैसाळ वार्ताहर
सांगलीचे नुतन जिल्हाधिकारी श्री.डॉ. मंताडा राजा दयानिधी यांनी म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 1 ला आज भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत म्हैसाळ नगरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच रश्मी आबासाहेब शिंदे- म्हैसाळकर यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी.एस. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरज पूर्व भागासह, कवठेमहांकाळ, जत, सांगोला या तालुक्याला वरदायी ठरलेला म्हैसाळ प्रकल्पाची माहिती नुतन जिल्हाधिकारी यांनी घेतली. पंपगृह व टप्पा क्र.१ ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी, सुनील कोरे, गाव कामगार तलाठी सुधाकर कुणके अन्य धिकारी वर्ग उपस्थित होते.