महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर विशेषता सहकार क्षैत्रातील अडचणींवर चर्चा झाल्याचे कळत आहे.
अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये सहकार धोरण, मंत्रिमंडळ विस्तार, राज्यपालांची निवृत्ती आणि ठाकरे गटाविरूद्धच्या न्यायालयीन लढ्याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रिय सहकारमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठीकनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देताना अमित शहा यांनी साखर उद्योगाला सशक्त करण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सागितले. साखर उद्योगाबद्दल सहाकरमंत्री अमित शाह हे गंभीर असल्याचे सांगून महाराष्ट्रातील सुधारणांवर विस्तृत चर्चा झाल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भुमिकेबद्दल सागंतले कि, यापूर्वीही राज्यपालांनी निवृत्तीबद्दल ईच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांच्या प्रकृतीमुळे पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहिले असल्याचे सांगितले.

