ऑनलाईन टिम नवी दिल्ली
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे देशभर राजकिय वातावरण तापले तापले आहे. जगभरातून या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत. मुस्लीम बहूल देशातून निषेधाचा सुर निघत असतानाच संयुक्त राष्ट्रामधून ही नाराजी व्यक्त होत आहे.
संयुक्त राष्ट्राचे अध्य़क्ष अँटोनिय़ो गुटरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता मला म्हणायचे आहे की, आम्ही सर्व धर्मांचा आदर आणि सहिष्णुता दृढपणे प्रोत्साहित केली पाहिजे.” या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) माजी प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रांची यादी वाढत असतानाच, संयुक्त राष्ट्रांनी थेट भारत सरकारला सुचवले आहे. “सर्व धर्मांचा आदर आणि सहिष्णुता सर्वांना प्रोत्साहित करते. मी स्वत: गोष्टी पाहिल्या आहेत. कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता मला सांगायचे आहे की, आपण सर्वांनी धर्मांचा आदर आणि सहिष्णुता दृढपणे प्रोत्साहित केली पाहिजे ” असे यूएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.