मुस्लिमांनी पथकाला प्रवेश नाकारल्याने काम अर्धवट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ काशीविश्वेश्वराचे मंदीर पाडून औरंगजेबाच्या काळात वाराणसीत बांधण्यात आलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे कार्य शनिवारी अपूर्ण राहिले आहे. हे सर्वेक्षण करुन या मशिदीसंबंधीची सत्यपरिस्थिती उघड करण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. मात्र, सर्वेक्षण करणाऱया तज्ञांच्या दलाला मुस्लीमांनी मशिदीत प्रवेश नाकारल्याने सर्वेक्षणाचे कार्य अर्धवट सोडण्यात आले.
आज रविवारी पुन्हा हे सर्वेक्षण पेले जाणार आहे. मशीद आणि तिच्या परिसराचे व्हिडीओ चित्रण करावे तसेच पुरातत्व नियमानुसार सर्वेक्षण करावे असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला होता. त्यानुसार कार्य सुरु करण्यात आले. काशीविश्वेश्वर मंदीर-ज्ञानवापी मशीद परिसरातील श्रृंगार गौरी मंदिरात पूजाअर्चा करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी करणारी याचिका काही हिंदूंनी सादर केली होती. या मागणीला अनुसरुन सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला होता.
तत्काळ मान्य करण्यास नकार
शुक्रवारी सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले होते. ते शनिवारीही सुरु राsिहले. न्यायालयाने या कामावर लक्ष ठेवण्यासाठी अजय कुमार मिश्र यांची नियुक्ती न्यायालयाचा प्रतिनिधी म्हणून केली होती. तथापि, मिश्र यांच्या निपक्षपातीपणा विरोधात संशय व्यक्त करणारी याचिका मशिदीच्या व्यवस्थापनाने अभय नाथ यादव या वकीलांच्या हातून सादर केली होती. मात्र, ती तत्काळ मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. यावर हे प्रतिनिधी आणि अभियोगकर्ता यांनी त्यांचे म्हणणे 9 जूनच्या सुनावणीच्या वेळी लेखी मांडावे, असा आदेश न्यायालयाने दिला.