Tarun Bharat

मध्यप्रदेशमध्ये नवीन वातावरण संशोधन प्रणाली

आशियातील सर्वात मोठे केंद्र : लवकरच उद्घाटन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मध्यप्रदेशमध्ये भोपाळच्या राजा भोज विमानतळापासून 20 किमी अंतरावर असलेल्या शिलखेडा येथे आशियातील सर्वात मोठे वातावरण संशोधन केंद्र आता हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या केंद्राच्या मदतीने 300 किमी अंतरावरील हवामानातील बदलांसह ढगांची स्थिती, गारा पडण्याची शक्यता आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज अचूकपणे वर्तवणे शक्य होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मान्सूनच्या स्थितीचा अचूक अंदाज वर्तवण्यासही या केंदाची मोठी मदत होणार आहे.

फिनलंडमधून आयात केलेल्या या संशोधन प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान सी बेड डय़ुअल पोलर मेट्रिक रडार आणि केयू बँड रडार बसवण्यात आले आहेत. ही प्रणाली पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) केंद्राशी थेट जोडण्यात आली आहे. आयआयटीएमचे संचालक आर. कृष्णन यांनी आपल्या सहकाऱयांसह या नव्या प्रणालीची नुकतीच पाहणी केली. हे संशोधन केंद्र शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठीही उपलब्ध असेल, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच ही प्रणाली पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ‘आयआयटीएम’च्या देखरेखीखाली ही प्रणाली स्थापन करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. सध्या केंद्राचे विद्युतीकरण, इंटरनेटशी संबंधित सुविधा, संरक्षक भिंत आणि इतर व्यवस्था पूर्ण झाल्या आहेत.

Related Stories

कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस संन्यासी

Patil_p

वैद्यकीय कर्मचाऱयांच्या सुरक्षेला प्राधान्य

tarunbharat

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Tousif Mujawar

मतदार ओळखपत्र ‘आधार’ला जोडणार

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाचे विक्रमी 216 नवे रुग्ण

Patil_p

शेतकरी आंदोलक आक्रमक; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

Archana Banage