Tarun Bharat

अलतगा ब्रह्मलिंग देवस्थानची नूतन कार्यकारिणी जाहीर

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

अलतगा येथील श्री ब्रह्मलिंग देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटीच्या नूतन कार्यकारिणीची निवड व सत्कार असा संयुक्त कार्यक्रम सोमवारी ब्रह्मलिंग मंदिरमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष बाळू पाटील, ऍड. एम. एम. भरमगोळ, ऍड. रवी पाटील, ऍड. नम्रता आलोजी, ग्रा. पं. सदस्य रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

1967 साली श्री ब्रह्मलिंग देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आहे. परंतु कांही थोडय़ा दिवसातच ट्रस्टच्या माध्यमातून होणारी धार्मिक कामे थांबली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई कायद्याच्या तरतुदीनुसार चॅरिटेबल कमिशनर येथून परवानगी घेऊन सदर कमिटीची नेमणूक केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रारंभी देवस्थानच्या नूतन पंच कमिटीने दीपप्रज्वलन केले.  उपस्थित कायदे सल्लागार वकिलांच्या हस्ते श्री ब्रह्मलिंग देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी या नामफलकाचे अनावरण केले. तत्पूर्वी ऍड. एम. एम. भरमगोळ, ऍड. रवी पाटील,. ऍड. नम्रता आलोजी, ट्रस्टचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंच कमिटीचा ग्रामस्थांतर्फे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे मार्गदर्शक संजय मेणसे व पत्रकार सदानंद चव्हाण यांचाही सत्कार केला.

यावेळी हभप इराप्पा जाधव, रमेश कांबळे, ऍड. एम. एस. भरमगोळ यांनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास हेच माध्यम अंगीकारून नूतन देवस्थान ट्रस्ट, पंच कमिटीने मार्गक्रमण करण्याचे मनोगत व्यक्त केले.

नूतन कार्यकारिणी : अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष बाळू पाटील, सेपेटरी गजानन घुग्रेटकर, देवस्थान पंच कल्लाप्पा पावशे, देवाप्पा आलोजी, सुबराव चौगुले, अशोक धुडूम, भरमा घुग्रेटकर, आप्पाजी पाटील, निंगाप्पा चौगुले, प्रकाश टक्केर, सुरेश घुग्रेटकर, बंडू सुतार, रामचंद्र सुतार, आप्पय्या पुजारी, नामनिर्देशक ऍड. एम. एम. भरमगोळ, ऍड. रवी पाटील, ऍड. नम्रता पाटील, शिवाजी पाटील, रमेश कांबळे.

Related Stories

वरेरकर नाटय़ संघाच्या ‘एकपात्री नाटय़’ स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p

तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Patil_p

अक्षय तृतियेच्या सणावरही मर्यादा

Omkar B

संगोळ्ळी रायाण्णा रोडच्या दुसऱया बाजूचे काँक्रिटीकरण

Patil_p

बेळगुंदीच्या जवानाचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni

जांबोटी भागात गणेशाचे नव्हे, अंधाराचे साम्राज्य

Omkar B
error: Content is protected !!