नवी दिल्ली
इंस्टाग्रामने आपले नवीन फिचर लाँच केले आहे. यामध्ये आता ग्राहकांना आपल्या कोणत्याही 3 रिल्स किंवा पोस्टला पिन करता येणार आहे. पोस्ट पिन करण्यात आल्यानंतर नेहमी तीन पोस्ट त्यांना टाइमलाइनवर सर्वात अव्वल स्थानी दिसून येणार आहेत. हे फिचर ट्विटर, टिक-टॉक आणि फेसबुकवर अगोदरपासूनच उपलब्ध आहे. कोणतीही पोस्ट पिन करण्यासाठी पोस्टवर क्लिक करावे, त्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करुन पिन टू योर प्रोफाईल वर क्लिक करत आपल्या पोस्ट पिन करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.